- पं. विजय बक्षी
आपण जेव्हा आगगाडीतून प्रवास करत असतो तेव्हा बाहेरची झाडे उलटया गतीने पळत असल्याचा भास होतो. त्याचवेळी आगगाडी व त्यातील सर्व प्रवासी एकाच दिशेने व गतीने गती गतीमान असले तरीही परस्परांना स्थिर भासतात. पृथ्वी स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरत असून आपण परस्परांना स्थिर वाटतो. किंबहुना पृथ्वीची गती आपण पृथ्वीवर रहून जाणू शकत नाही. पण अंतराळातून पृथ्वीची गती समजू शकेल. या उदाहरणातून हे लक्षात येईल की गती जाणून घ्यायची असेल तर कोणतातरी संदर्भ आवश्यकच आहे. वरील उदाहरणात आगगाडीच्या आतील प्रवाशांचा संदर्भ घेतला तरी सर्वांची गती एकसम असल्याने ते स्थिर भासतात, पण बाहेर रस्त्यावर असणार्यांचा संदर्भात आगगाडी गतीमान आहे. म्हणजेच निरपेक्ष गती असत नाही. गती जाणून घ्यायला संदर्भ आवश्यक असतो.
हेच तत्व आपल्या संगीतात कसे जाणवते ते आता पाहू या.
समजा एखादा गायक कलावती रागाचे आलाप गात आहे अशी कल्पना करुय. दूर अंतरावरून A ही व्यक्ती हे आलाप ऐकते आहे. पण त्याला गयाना बरोबर वाजणारा तानपुरा ऐकू येत नाही. तो गाणे ऐकण्यात तल्लीन झाला आहे. जरा वेळाने B व्यक्ती तेथे येते आणि विचारते, "काय हो, हा कोणता राग आहे?"
तेव्हा A व्यक्ती म्हणते, "हा राग अभोगी आहे."
आता तुम्ही म्हणाल A व्यक्तीला रागांची ओळख नाही, म्हणून त्याने वेगळाच राग सांगितला. पण तसे नाही बर का - असे घडणे सहज शक्य आहे. गतीच्या उदाहरणात आपण पहिलेच कि संदर्भ शिवाय गतीचे आकलन होऊ शकत नाही. तसेच "षड्ज" कोणता आहे - हा संदर्भ निश्चित केल्याशिवाय त्या रागाचे नाव जाणून घेणे अशक्य आहे. A व्यक्ती ने वेगळा षड्ज मनात कल्पून गायन ऐकल्यामुळे त्याला ते आलाप राग अभोगी चे वाटले - यात त्याची काही चूक नाही. हे कसे ते खालील स्वरावालीत स्पष्ट होइल.
गायकाचा षड्ज सा मानून राग कलावतीचे स्वर असे होतील:
खाली संपूर्ण तक्ता दिला आहे:
राग भूप मध्ये ५ स्वर आहेत:
आता रे ला सा मानले, अथवा सा ला दोन पावले पुढे सरकवले - तर नवीन स्वर समुह असा होतो:
हा नवीन स्वर समुह कसा तयार होतो हे खाली दर्शविले आहे.
गायकाचा षड्ज सा मानून राग कलावतीचे स्वर असे होतील:
सा ग प ध नि सां गं पं
आता यातील प स्वराला संदर्भ षड्ज मानले तर हे स्वर असे होतील:
म ध सा रे ग म ध सां
हेच स्वर अभोगी रागातील असल्यामुळे A व्यक्तीला तो आलाप राग अभोगीचा वाटला. ही खरं तर, अकस्मात मूर्च्छना झाली. कोणत्याही स्वरपसून क्रमाने स्वर घेऊन मूर्च्छना तयार होते.
आपण मूर्च्छना दोन भागात समजून घेऊ. ते असे आहेत:
१. स्वरावली - क्रमाने सा बदलून होणारे बदल.
२. स्वर वेचीताना…
आपण मूर्च्छना दोन भागात समजून घेऊ. ते असे आहेत:
१. स्वरावली - क्रमाने सा बदलून होणारे बदल.
२. स्वर वेचीताना…
१. स्वरावली -
सा, रे, ग, म, प, ध, नि असे ७ स्वर लिहून घेऊ. नंतर क्रमाने सा पुढे सरकवत नेऊ. रे, ग, म, ध, नि या स्वरांची दुहेरी रुपेही विचारात घेऊ.
आपली पहिली ओळ अशी असेल:
सा रे रे ग ग म मे प ध ध नि नि
आता जर कोमल रे ला षड्ज मानले तर:
नि सा रे रे ग ग म मे प ध ध नि
खाली संपूर्ण तक्ता दिला आहे:
कोणत्याही स्वरापासून क्रमाने स्वर घेऊन मूर्च्छना तयार होते. प्राचीन ग्रंथातही "मूर्च्छना" विषयी चर्चा केली आहे.
आपण सर्वांना संवादिनी परिचित आहेच. संवादिनी शिकणारा विद्यार्थी विचारतो, "सर, यातला सा कोणता?" आता मूर्च्छना जाणून घेतल्यावर तुम्हाला याचे उत्तर देत येईल. त्या पैकी कोणत्याही पट्टीला सा मानता येते. वरील गतीच्या उदाहरणाप्रमाणे येथेही संदर्भानुसार सा बदलू शकतो.
आपण जेव्हा म्हणतो की "मी काळी १ मध्ये गातो" तेव्हा त्याचा अर्थ असा असतो - "माझा संदर्भ काळी १ च्या सा बरोबर आहे. काळी १ म्हणजे माझा षड्ज."
एखादे गाणे "माध्यमात आहे " याचा अर्थ असा की मूळ सा आता बदलून - माध्यमाला सा मानून - गीत गायले जाणार आहे.
२. स्वर वेचीताना… :
मूर्च्छना याचा मुख्य उपयोग हा एका स्वर समूहाच्या आधारे नवीन स्वर समूह तयार करणे असा आहे. वरील तक्त्याचा उपयोग करून ते साध्य होईल.राग भूप मध्ये ५ स्वर आहेत:
सा रे ग प ध
नि सा रे म प
हा नवीन स्वर समुह कसा तयार होतो हे खाली दर्शविले आहे.
मुख्य स्वरांची "छाया" अथवा "दृष्टी" ज्या मूर्च्छना स्वरावलीतील स्वरांवर पडते - ते स्वर आपण वेचणार आहोत. तरबेज जनांच्या लक्षात आले असेल की नवीन/मूर्च्छना स्वर हे राग मेघ/मधमाध सारंग चे आहेत.
तसेच, जर भूप मधील गांधार ला षड्ज मानले तर मूर्च्छना स्वर राग मालकंस चे मिळतात. राग भूप ची संपूर्ण मूर्च्छना खालील तक्त्यात दिली आहे.
पं. रविशंकरजींनी राग सरस्वतीच्या मूर्च्छना करून राग परमेश्वरी, राग गंगेश्वरी, राग रंगेश्वरी, इ. रागांची निर्मिती केली.
मूर्च्चना स्वर समूह हा स्वतंत्र मानून आपण आपल्या नैसर्गिक षड्ज आधारे गाऊ शकतो, अथवा मुख्य रागातून दुसऱ्या रागाची छटा दाखीवण्याचे कौशल्य आत्मसात करू शकतो. फक्त रागातील स्वर वापरावे असा नियम नाही. कुठलाही स्वर समूह हा मुख्य स्वर समुह आपण मानून मूर्च्छना करता येते.
उपयुक्तता:
१. नव राग निर्मिती
२. चित्रपट संगीत/सुगम संगीत मध्ये मूर्च्छने चा वापर प्रचलित आहे.
३. शास्त्रीय संगीता मध्ये "स्वर-संवाद" चा रियाज, "स्वर-प्रभुत्व", इ. मध्ये मूर्च्छने चा वापर होतो.
आशा करतो की आपणास हा लेख उपयोगी वाटला. आगामी लेखांमध्ये उपयुक्तते बद्दल सविस्तर लिहिण्याचे योजीले आहे.
लोभ असावा ही नम्र विनंती.
धन्यवाद.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा